देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केलं भारतीय संघाचं कौतुक; रोहित, विराटबद्दल बोलाताना म्हणाले, “फॉर्म हा…”

 Devendra Fadnavis Praised Team India After Champions trophy 2025 Win : भारतीय क्रिकेट संघाने दुबई येथे पार पडलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाचे भरभरून कौतुक केले जात आहे. यादरम्यान आज विधानसभा अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.

भारताच्या ऐतिहासिक विजयाबद्दल विधानसभा सभागृहात बोलताना फडणवीस म्हणाले की, “सर्वांसाठी कालचा दिवस ऐतिहासिक आहे, कारण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध करत ही ट्रॉफी जिंकली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. यानिमीत्ताने संघाचे कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक गौतम गंभीर यांचं मनापासून अभिनंदन करूया. कॅप्टन रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात टीमने प्रचंड मेहनत केली आणि शेवटच्या सामन्यात ज्या प्रकारे रोहित शर्मा खेळले आणि ज्या प्रकारे त्यांनी आपली नेहमीची शैली बदलून, मध्ये वेगाने मधेच संथ अशा प्रकारे पीचवर टिकून ७६ धावा काढल्या या ७६ धावाच सामन्याच्या निर्णायक धावा होत्या.”

Comments