Posts

Showing posts from March, 2025

पाकिस्तानच्या उच्चाधिकाऱ्यांना अमेरिकेनं परत पाठवलं; व्हिसाच्या मुद्द्यावरून देशात प्रवेश नाकारला!

Image
  अवघ्या आठवड्याभरापूर्वी अमेरिकेच्या संयुक्त सभेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे आभार मानले होते. एका अट्टल दहशतवाद्याला पकडून देण्यात पाकिस्तान सरकारने मदत केल्याचा उल्लेख त्यांनी केला. पण नुकतंच अमेरिकन प्रशासनाने पाकिस्तानच्या उच्चाधिकाऱ्यांना देशात प्रवेशच नाकारल्यामुळे या मुद्द्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा पाहायला मिळत आहे. के. के. एहसान वॅगन असं या उच्चाधिकाऱ्यांचं नाव असून त्यांच्या व्हिसामध्ये आक्षेपार्ह नोंदी आढळल्याचा दावा करण्यात येत आहे. पाकिस्तानचे तुर्कमेनिस्तानमधील उच्चाधिकारी वॅगन सोमवारी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस विमानतळावर उतरले. विमातनतळावर त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली. पाकिस्तानातून अमेरिकेत प्रवास करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्र त्यांच्याकडे होती. वॅगन हे अमेरिकेत सुट्ट्यांसाठी जात असताना त्यांना लॉस एंजेलिस विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी हटकलं आणि कागदपत्रांवर आक्षेप घेतला. बिझनेस स्टँडर्डनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केलं भारतीय संघाचं कौतुक; रोहित, विराटबद्दल बोलाताना म्हणाले, “फॉर्म हा…”

  Devendra Fadnavis Praised Team India After Champions trophy 2025 Win :  भारतीय क्रिकेट संघाने दुबई येथे पार पडलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाचे भरभरून कौतुक केले जात आहे. यादरम्यान आज विधानसभा अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. भारताच्या ऐतिहासिक विजयाबद्दल विधानसभा सभागृहात बोलताना फडणवीस म्हणाले की, “सर्वांसाठी कालचा दिवस ऐतिहासिक आहे, कारण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध करत ही ट्रॉफी जिंकली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. यानिमीत्ताने संघाचे कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक  गौतम गंभीर  यांचं मनापासून अभिनंदन करूया. कॅप्टन रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात टीमने प्रचंड मेहनत केली आणि शेवटच्या सामन्यात ज्या प्रकारे रोहित शर्मा खेळले आणि ज्या प्रकारे त्यांनी आपली नेहमीची शैली बदलून, मध्ये वेगाने मधेच संथ अशा प्रकारे पीचवर टिकून ७६ धावा काढल्या या ७६ धावाच सामन्याच्या निर्णायक ध...